Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंगराज्यातील ‘या’ ७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा! अवकाळी पावसासोबत ‘या’ संकटाची...

राज्यातील ‘या’ ७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा! अवकाळी पावसासोबत ‘या’ संकटाची भीती

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून नागरिकांना उष्णता, (districts)गारठा आणि अचानक पावसाचा अनुभव येत आहे. भारतीय हवामान विभागाने आता काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला असून ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जानेवारी महिन्यात थंडीचा जोर कमी होत असून वातावरण अधिक दमट होत चालले आहे.राज्याच्या विविध भागांत तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी जाणवत असताना आता सकाळ-संध्याकाळ उकाडा जाणवू लागला आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

पुणे शहरात गेल्या काही दिवसांत थंडी ओसरल्याचे चित्र आहे. (districts)किमान तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली असून कमाल तापमानातही बदल नोंदवण्यात आला आहे. परिणामी सकाळी थंडी कमी आणि दुपारी उकाडा अधिक जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी शहरात कडाक्याची थंडी जाणवत होती, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.ढगाळ वातावरणामुळे शहरासह उपनगरांमध्ये दमट हवामान जाणवत असून नागरिकांना घामाघूम करणारी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. तापमान 11 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने थंडी जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे.

 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार , राज्यातील धुळे, पालघर,(districts)नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जानेवारी महिना संपत असतानाही राज्यात पावसाचे ढग सक्रिय असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. हवामानातील सतत बदलांचा आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याने प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -