Thursday, February 19, 2026
Homeमहाराष्ट्रआईचा जीव घेतला, 33 वर्षांचा लेक माऊलीच्या बॉडीशेजारी गोट्या खेळत बसला, महाराष्ट्र...

आईचा जीव घेतला, 33 वर्षांचा लेक माऊलीच्या बॉडीशेजारी गोट्या खेळत बसला, महाराष्ट्र सुन्न

शहरातील सावेडी उपनगरात मंगळवारी दुपारी उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. पैशांच्या किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या आईचा अडकित्त्याने वार करत निर्घृण खून केला

 

त्यानंतर मृतदेहाशेजारी शांतपणे गोट्या खेळत बसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नवलेनगर परिसरातील गजानन मंदिरासमोरील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. बेबी सुधाकर गवारे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा सुहास सुधाकर गवारे (वय ३३) याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

पैसे न दिल्याचा राग; अडकित्त्याने वार

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुहास हा आईकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. मंगळवारी दुपारी पुन्हा पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात सुहासने आईला बेडरुममध्ये डांबून ठेवत कैऱ्या कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अडकित्त्याने डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या बेबी गवारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

घटनेनंतर आरोपीने दरवाजाला आतून खाट व धान्याच्या कोठ्या लावून घेतल्या आणि आईचा मृतदेह शेजारी असतानाच पलंगावर बसून गोट्या खेळत राहिला. हातातील कात्री, अडकित्ता आणि गोट्या खिडकीतून पोलिसांना दाखवत तो स्वतःशीच बडबड करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरवाजा तोडून पोलिसांची कारवाई

 

परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडण्यास सांगूनही आरोपी बाहेर आला नाही. सुमारे अर्धा तास समजूत काढल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मूळ कुटुंब कोपरगावचे ; बहिणीची फिर्याद; खुनाचा गुन्हा दाखल

 

गवारे कुटुंब मूळचे कोपरगाव तालुक्यातील आहे. पतीच्या निधनानंतर बेबी गवारे या मुलासह सावेडीतील भाड्याच्या खोलीत राहत होत्या. त्या घरकाम करून संसार चालवत होत्या. आरोपी सुहास कोणते काम करत होता, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. मयत महिलेची मुलगी सुवर्णा दिगंबर घुले यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुहास गवारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ्याकडून चूक झाली अशी कबुली दिली

 

चौकशीदरम्यान आरोपीने माझ्याकडून चूक झाली अशी कबुली दिली. मात्र त्याचे वर्तन संशयास्पद  आले आहे. ही घटना उघड होताच गुलमोहोर रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. आईच्या मायेचा असा थरारक अंत झाल्याने शहरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पैशांसाठी मुलाने आईचा जीव घेण्याचा हा प्रकार समाजमन सुन्न करणारा ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -