आज छत्तीसगड सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे.(announcement)अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे. या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी महत्त्वाची घोषणा करण्या आली आहे. मुलींसाठी नवीन राणी दुर्गावती योजना सुरु करण्यात आली आहे. याचसोबत अस्तित्वात असलेल्या योजनेसाठी निधी वाढवण्यात आला आहे.अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी योजनेबाबत घोषणा केली आहे.मुलींसाठी राणी दुर्गावती योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला दीड लाख रुपये दिले जाणार आहेत.
मुलींना आर्थिक सुरक्षितता आणि स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी (announcement) ही योजना सुरु करण्यात आली आहे. गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिक माहिती दिली जाणार आहे.छत्तीसगड सरकारने दोन वर्षांसाठी महतारी वंदन योजना सुरु केली होती. योजनेसाठी अर्थसंकल्पात ८,२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी ही योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १००० रुपये जमा केले जातात. या योजनेला आता दोन वर्ष पूर्ण झाले आहेत.
महतारी वंदन योजनेअंतर्गत आतापर्यंत २४ हप्ते जमा केले आहेत.(announcement) या योजनेत २१ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांना लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. त्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.





