Tuesday, March 3, 2026
Homeमहाराष्ट्रगुंतवणूकदारांची धुळवड! 15,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा, आता स्टॉकचे दोन तुकडे, कमाईच कमाई

गुंतवणूकदारांची धुळवड! 15,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा, आता स्टॉकचे दोन तुकडे, कमाईच कमाई

दहा वर्षांत तब्बल 15,000 टक्क्यांहून अधिक परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंपनीने आपल्या शेअर्सचे विभाजन करण्याचा निर्णय जाहीर केला असून यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी शेअर अधिक परवडणारा होणार आहे.

 

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याचा एक शेअर दोन तुकड्यांत विभागला जाणार आहे.(percent return) या निर्णयानंतर प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 5 रुपये इतकी होईल. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा स्टॉक स्प्लिट केला जात आहे. या प्रक्रियेसाठी 9 मार्च 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. रेकॉर्ड डेटपर्यंत ज्यांच्या नावावर शेअर्स असतील त्यांनाच या विभाजनाचा लाभ मिळणार आहे.

 

शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 4,161.05 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात शेअरने सुमारे 27 टक्क्यांची वाढ नोंदवली असून याच कालावधीत सेन्सेक्समध्ये सुमारे 8.95 टक्क्यांची वाढ झाली आहे. (percent return) त्यामुळे कंपनीच्या कामगिरीने व्यापक बाजारपेठेपेक्षा सरस प्रदर्शन केले आहे.

 

 

52 आठवड्यांतील उच्चांक 5,064.30 रुपये तर नीचांक 2,510 रुपये इतका राहिला आहे. सध्या कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 4,150.65 कोटी रुपये आहे. (percent return) मागील दोन वर्षांत शेअरने 118 टक्के परतावा दिला आहे, तर तीन वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 342 टक्क्यांचा नफा मिळवून दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे.स्टॉक स्प्लिटमुळे कंपनीचे एकूण बाजारमूल्य बदलत नसले तरी शेअरची किंमत तुलनेने कमी झाल्याने व्यवहारातील तरलता वाढू शकते आणि लहान गुंतवणूकदारांचा सहभागही वाढण्याची शक्यता असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -