Saturday, April 4, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! प्रवासी घेण्यावरून रिक्षाचालक भिडले; थेट डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू

धक्कादायक! प्रवासी घेण्यावरून रिक्षाचालक भिडले; थेट डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू

प्रवासी घेण्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकांमध्ये झालेल्या मारामारीत एकजण जखमी झाला. या प्रकरणी रिक्षा चालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज परिसरातील घटनेत रिक्षा चालकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला.

 

शेखर गोविंद पुजारी ( ४९, रा. घुंगरवाली चाळ, संतोषनगर, कात्रज ) हा रिक्षाचालक जखमी झाला आहे.

 

या प्रकरणी कुणाल कांबळे (रा. बिबवेवाडी), एस. मिसाळ उर्फ टायगर यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार रिक्षाचालक पुजारी हे कात्रज परिसरात थांबले होते.

 

त्या वेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरुन त्यांचा आरोपींशी वाद झाला. वादातून आरोपींनी पुजारी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू पुजारी यांच्या डोक्यात घातला. पुजारी गंभीर जखमी झाले. सहायक फौजदार रवींद्र भाेसले तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -