राज्यात मोठी खळबळ (Assembly)उडवणारी घटना समोर आली आहे. विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आल्या आहेत. संबंधित ईमेल मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या असून संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात हा ईमेल (Assembly) कुठून पाठवण्यात आला याचा शोध घेतला जात आहे. सायबर सेल देखील या प्रकरणात सक्रिय झाला असून आरोपीचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने (Assembly) विधानभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून ही धमकी खोटी आहे का याचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, कोणतीही जोखीम न घेता सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.


