Tuesday, April 14, 2026
Homeकोल्हापूरजोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर...

जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथे अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालवलवत दुचाकीने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या आनंदा बापू नाईक (वय ७०, रा. सातार्डे) या वृद्धाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणी राजेंद्र सदाशिव नाईक (वय ३८, रा.असंडोली, ता. गगनबावडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दगडू वसंत हांडे (वय ४४, रा. सातार्डे, ता. पन्हाळा) व त्यांचा चालक अल्पवयीन मुलगा या दोघांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मयत आनंदा नाईक हे सकाळी हे पायी विहिरीकडे निघाले होते. ते सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातार्डे फाटा मार्गावरील कृष्णात पाटील यांच्या शेताजवळील वीज डी.पी. परिसरात पोहचले असताना. मागून आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नाईक यांना तातडीने कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

मात्र उपचार सुरू असताना दि. ४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुला बरोबर त्याला दुचाकी चालवण्यास दिल्यामुळे वडील दगडू हांडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस नाईक चव्हाण यांनी दिली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -