भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे कामकाच जवळपास ४ दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे. बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.
आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, कामाच्या न्याय्य परिस्थितीची खात्री करण्यासाठी आणि कर्मचारी व ग्राहक या दोघांच्याही हिताचे जतन करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
AISBISF ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशननं सांगितलं की 25 आणि 26 मे रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचा पूर्ण स्टाप संपावर असेल. संपत दोन दिवसांचा असेल मात्र बँकेचं कामकाच चार दिवस बंद राहणार आहे. कारण 23 मे या दिवशी चौथा शनिवार आहे तर 24 मे रोजी रविवारची सुट्टी आहे. State Bank Of India
महासंघाने (फेडरेशनने) लिहिलेल्या पत्रानुसार, त्यांनी एकूण १६ मागण्या मांडल्या असून त्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. “कामगारांचे हक्क पद्धतशीरपणे चिरडले जात आहेत. अनेक दशकांच्या संघर्षानंतर कष्टाने मिळवलेले संरक्षण आणि अधिकार कमकुवत केले जात आहेत, डावलले जात आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विविध करारांना केवळ औपचारिकतेचे स्वरूप दिले जात आहे आणि विरोधाचे आवाज बाजूला सारले जात आहेत,” असे AISBISF ने म्हटले आहे. State Bank Of India
महासंघाने उपस्थित केलेल्या मागण्यांमध्ये संदेशवाहक (messengers) आणि सशस्त्र रक्षक (armed guards) यांची भरती करणे, कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या राखणे आणि कायमस्वरूपी पदांचे ‘आउटसोर्सिंग’ थांबवणे या बाबींचा समावेश आहे. AISBISF ने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतनाशी संबंधित समस्या, २०१९ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आंतर-मंडळ बदल्यांचा अभाव यांसारख्या मुद्द्यांवरही भर दिला आहे.
एसबीआयच्या कामगार प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनी खालील मागण्या केल्या आहेत:
१. संदेशवाहकांची भरती
२. सशस्त्र रक्षकांची भरती
३. निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापकाचा पर्याय एनपीएस कर्मचाऱ्यांसाठी बदलणे
४. २०१९ पासून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आंतर-मंडळ बदल्या
५. कायमस्वरूपी नोकऱ्यांचे बाह्यस्रोत थांबवणे
६. पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती
७. स्टेट बँक ऑफ इंडियामधील समानतेचा मुद्दा
८. करिअर प्रगती योजनेचा आढावा
९. १० व्या द्विपक्षीय सेवानिवृत्तांना काल्पनिक ८ वी वेतनवाढ
१०. १५.०७.२०२४ पासून वैद्यकीय सल्ला शुल्क लागू करणे
११. वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत सुधारणा
१२. ७ व्या बीपीएस सेवानिवृत्तांच्या निवृत्तीपासून त्यांच्या निवृत्तीवेतनात सर्व वेतन घटक समाविष्ट करणे
१३. एचआरएमएस समस्यांचे निराकरण करणे
१४. कामगार कर्मचारी संचालकाची नियुक्ती
१५. पीएफ विश्वस्त नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती
१६. क्रॉस-सेलिंगच्या नावाखाली होणारी दिशाभूल थांबवा




