जर तुम्ही दहा हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगला मोबाईल फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. १० हजार रुपयांचे बजेट आणि ५० मेगा पिक्सेलचा कॅमेरा तसेच ५००० एमएएच बॅटरीचे दोन फोन तुमच्यासाठी योग्य ठरतील. एक फोन सॅमसंग कंपनीचा आहे तर दुसरा फोन Ai+ चा आहे. या फोनची किंमत किती आणि ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांची फिचर्स काय चला पाहूयात…
Samsung Galaxy F07 Price आणि फिचर्स
५० मेगा पिक्सेल ड्युअल रिअर कॅमरा सेटअपवाला हा बजेट फोन फ्लिपकार्टवर ९,९९९ रुपयांना विकला जात आहे. या किंमतीत तुम्हाला ४ जीबीचा रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. खास बाब म्हणजे या बजेट फोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी डिस्प्ले, मीडियाटेक हिलियो जी ९९ प्रोसेसर आणि ८ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएच बॅटरी दिली जात आहे. या फोनला डस्ट एण्ड वॉटर रेसिस्टन्ससाठी आयपी ५४ रेटिंग मिळालेली आहे.
या हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा सेंसर मिळतो. या फोन खरेदी करताना फ्लिपकार्ट एक्सिस वा फ्लिपकार्ट एसबीआय बँक कार्डने पमेंट केल्यावर ५०० रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काऊंटचा फायदा देखील मिळतो.
Ai Plus Pulse 2 Price आणि फिचर्स
५० मेगा पिक्सेलचा रिअर कॅमेऱ्या सोबत येणाऱ्या या हँडसेटमध्ये ६.७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्लिकार्टवर हा फोन तुम्हाला ८,९९९ रुपयांना मिळेल. या किंमतीत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये ५००० एमएएचहून जास्त क्षमतेची बॅटरी मिळेल. हा फोन ६००० mAh बॅटरी क्षमतेचा आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एंड्रॉईड १६ ऑपरेटिंग सिस्टीम सह येतो.



