Saturday, May 23, 2026
Homeमहाराष्ट्रज्याची भीती तेच घडले, थेट दणका, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ,...

ज्याची भीती तेच घडले, थेट दणका, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ, तब्बल..

इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतात बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली. दहा दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालीये. मोठा दणका सर्वसामान्यांना बसल्याचे दिसतंय. पहिल्यांदाच थेट 3 रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा वाढ झाली. आज 23 मे 2026 रोजी सरकारने दहा दिवसांमध्ये तिसऱ्यांदात मोठी वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये केली. देशात इंधनाचा तुटवडा आहे. इंधनाच्या तुटवड्यासोबतच आता सतत पेट्रोल आणि डिझेलच्या कितमीमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकारकडून या काळात मार्ग काढण्याकरिता एका मागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. सोने न खरेदी करण्याचे आवाहन अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आला. आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली

 

 

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पेट्रोलच्या किमतीमध्ये 87 पैशांची वाढ तर डिझेलच्या किमतीमध्ये 91 रूपयांची वाढ करण्यात आली. सरकारने इराण आणि अमेरिका युद्धात कोणत्याही प्रकारची इंधनात भाव वाढ होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासू आता तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. या युद्धात महागाईचा मोठा फटका बसत आहे.

 

महागाई सतत वाढताना दिसत आहे. अनेक गोष्टींच्या भावात वाढ झाली. त्यामध्येच राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई बघायला मिळतंय. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे टंचाई असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमाकांचा देश आहे जो मोठ्या प्रमाणात ऊर्जा आयात करतो. दिवसेंदिवस भारतात ऊर्जेची मागणी वाढत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -