Homeमहाराष्ट्रFlipkart वरून आता ऑर्डर करू शकता गरमागरम जेवण; झोमॅटो अन् स्विगीला टक्कर,...

Flipkart वरून आता ऑर्डर करू शकता गरमागरम जेवण; झोमॅटो अन् स्विगीला टक्कर, फूड डिलिव्हरी सर्विस होतेय सुरू

ई कॉमर्स जगातील दिग्गज Flipkart आता फूड डिलिव्हरी क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी तयार आहे. कंपनी लवकरच आपली फूड डिलिव्हरी सेवा सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे Swiggy आणि Zomato सारख्या कंपन्यांना कडवी स्पर्धा दिसणार आहे.

 

Flipkart चा प्लॅन काय?

 

Flipkart चे CEO कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, कंपनी येत्या काही आठवड्यांत फूड डिलिव्हरी सेवा सुरू करणार आहे.

 

सुरुवातीला निवडक शहरांमध्ये चाचणी म्हणून ही सेवा उपलब्ध होईल. ग्राहकांच्या प्रतिसादानुसार नंतर इतर शहरांमध्ये विस्तार केला जाईल.

 

Flipkart ONDC (Open Network for Digital Commerce) सोबत भागीदारी करून ही सेवा सुरू करणार आहे. यामुळे कंपनीला रेस्टॉरंट्स आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या मोठ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळेल.

 

Flipkart Minutes चा यशस्वी अनुभव

 

फ्लिपकार्टने ‘Flipkart Minutes’ या quick-commerce सेवेद्वारे आधीच आपली क्षमता सिद्ध केली आहे.

 

दोन वर्षांत कंपनीने 130 शहरांमध्ये 1,000 हून अधिक micro-fulfillment centers उघडली आहेत. Tier-2 आणि Tier-3 शहरांमध्ये मागणीत मोठी वाढ झाली आहे.

 

Zomato आणि Swiggy ला आव्हान

 

फूड डिलिव्हरी बाजारात सध्या Swiggy आणि Zomato वर्चस्व गाजवत आहेत. Flipkart च्या प्रवेशामुळे या दोन्ही कंपन्यांना नवीन स्पर्धा भेडसावणार आहे.

 

Rapido ने ‘Only’ आणि Swiggy ने ‘Toing’ सारखी नवीन फीचर्स आणली आहेत, पण फ्लिपकार्ट चा मोठा नेटवर्क आणि अनुभव यामुळे बाजारात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -