Homeमहाराष्ट्र15 ऑगस्टपासून 10 किलोचा सिलिंडर मिळणार; सरकारी तेल कंपनीचा मोठा निर्णय

15 ऑगस्टपासून 10 किलोचा सिलिंडर मिळणार; सरकारी तेल कंपनीचा मोठा निर्णय

देशातील २४ राज्यांमधील १०० शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी तेल कंपनीने या शहरांमध्ये १० किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

 

येत्या १५ ऑगस्टपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

 

BPCL ने जूनच्या तिमाहीत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी नवीन स्रोतांवर विशेष भर दिला आहे. कंपनीने आपल्या एकूण खरेदीपैकी ३८ टक्के कच्चे तेल एकट्या रशियाकडून खरेदी केले आहे. स्पॉट मार्केटमधून तेलाची खरेदी वाढवून ६९ टक्क्यांवर नेण्यात आली आहे. तर रशियाव्यतिरिक्त कंपनीने व्हेनेझुएला आणि अंगोला या देशांकडूनही कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे. सध्या BPCLकडे ३.८ दशलक्ष टन (३८ लाख टन) कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे, जो पुढील ३५ दिवसांची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.

 

जूनच्या तिमाहीत BPCL चा एकूण महसूल सुमारे १.५१ लाख कोटी रुपये इतका राहिला आहे. या कालावधीत कंपनीला ३,९६२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला असला, तरी हा तोटा बाजारतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. यामुळेच अनेक आघाडीच्या ब्रोकरेज फर्म्सनी कंपनीच्या शेअर्सवर आपला सकारात्मक विश्वास कायम ठेवला आहे.

 

दरम्यान, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांचा परिणाम आगामी काळातील कमाईवर होऊ शकतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यातच आता कंपनीने १० किलो वजनाचा सिलिंडर वितरित करण्याची घोषणा केली आहे.

 

१० किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर हा अशा ग्राहकांसाठी अत्यंत सोयीचा आणि उत्तम पर्याय मानला जातो ज्यांचा गॅसचा वापर मर्यादित आहे, ज्यांना दरमहा १४.२ किलोचा मोठा घरगुती सिलिंडर घेण्याची आवश्यकता भासत नाही. हा लहान सिलिंडर प्रामुख्याने छोटे कुटुंब, नोकरी किंवा शिक्षणासाठी भाड्याच्या घरात राहणारे लोक आणि एकटे राहणारे नागरिक यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या आणि हाताळणीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -