तरी चुकीमुळे अचानक तुमच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये आले आणि रातोरात तुम्ही कोट्यधीश झालात, अशी कल्पना तुम्ही कधीतरी केली असेल. कोणतंही काम न करता, मेहनत न घेता, कुणाच्या तरी चुकीने तुम्ही रातोरात अब्जाधिश झालात, तर ही बाब एखाद्या लॉटरी पेक्षा नक्कीच कमी नसेल.
पण अशी घटना खरोखर घडली आहे.
एका बँक खात्याचा सर्व्हर खराब झाल्याने अनेकांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचं समोर आलं आहे. हे लोक रातोरात मालामाल झाले असून त्यांच्या बँक खात्यात ७ पिढ्या बसून खातील इतका पैसा जमा झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ही बँक आपल्या भारतातील असून याचे देशभर लाखो खातेदार आहेत. त्यामुळे तुमच्याही खात्यात अशाप्रकारे पैसे आले नाहीत ना? एकदा चेक कराच…
नेमका प्रकार काय घडला?
ही घटना पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील आहे. येथील रहिवासी असलेल्या कश्मीरा शेख (३६) या पतऱ्याचे छप्पर असलेल्या छोट्याशा घरात राहतात. त्या जरी एम्ब्रॉयडरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
कश्मीरा यांनी काही दिवसांपूर्वी एलपीजी गॅस सिलिंडर बूक केला होता. त्याची सबसिडी खात्यात जमा झाली आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्या पंजाब नॅशनल बँकेच्या स्थानिक शाखेत गेल्या होत्या. बँकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यात शेवटचे क्रेडिट तब्बल ९९,९९,९९,९९७ रुपये (जवळपास १०० कोटी रुपये) झाल्याचे सांगण्यात आलं, हा आकडा ऐकून त्या पूर्णपणे चक्रावून गेल्या. एवढी मोठी रक्कम कशी जमा झाली असा प्रश्न त्यांना पडला. पण याचं उत्तर ना बँक कर्मचाऱ्याकडे होतं, ना कश्मिरा यांच्याकडे.
शंभर कोटी जमा झाले अन् बँक खाते झाले फ्रीझ!
अचानक एवढी मोठी रक्कम खात्यात आल्याचे समजताच बँकेनं त्यांचं बँक खातं गोठावलं आहे. या अनपेक्षित प्रकारानंतर बँकेने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे एकमेव बँक खातं ‘फ्रीझ’ केलं आहे. मात्र या प्रकारानंतर जेव्हा खोलात जाऊन तपास केला गेला. तेव्हा हा प्रकार एकट्या कश्मीरा यांच्यासोबतच घडलेला नाही. तर अनेकांसोबत घडल्याची माहिती समोर आली आहे.
बँकेच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे बँकेतील कोट्यवधि रुपयांची रक्कम विविध खातेदारांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती बँकेतील सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोलकात्यात क्लाउड किचन चालवणाऱ्या नुपूर गुप्ता यांच्या खात्यातही अशाच प्रकारे अचानक तब्बल ४७ कोटी रुपये जमा झाले होते, ज्याबद्दल त्यांची चौकशी झाली होती.
बँकेच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे बँकेतील कोट्यवधि रुपयांची रक्कम विविध खातेदारांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती बँकेतील सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोलकात्यात क्लाउड किचन चालवणाऱ्या नुपूर गुप्ता यांच्या खात्यातही अशाच प्रकारे अचानक तब्बल ४७ कोटी रुपये जमा झाले होते, ज्याबद्दल त्यांची चौकशी झाली होती.


