Homeमहाराष्ट्रदेवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू

देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रस्ते अपघाताच्या (Accident) घटनांमुळे समाजमन व्यथित होत असून परिसरात हळहळ व्यक्त होते. मात्र, गेल्या काही महिन्यात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय.

 

नांदेडमध्ये आज भीषण अपघाताच दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता बेळगाव (Belgaon) जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. तर, संबंधित कुटुंब पुण्यातील (Pune) रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

 

बेळगावच्या गोकाक तालुक्यात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. त्यात, एका 4 वर्षीय चिमुकल्यालाही आपला जीव गमवावा लागला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ओंकार चंद्रशेखर मांडरे (वय २६), रेश्मा मांडरे (वय ३२) आणि देवांश मांडरे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत.

 

पुण्यातील मांडरे कुटुंब सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी कारने जात होते. प्रवासादरम्यान येरगट्टीहून गोकाकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि कारमधील तिघांनी जागीच प्राण सोडले. या अपघातात श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे आणि हर्षदा मांडरे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, या दुर्घटनेत मांडरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -