सलूनच्या नावाखाली देहव्यापार, नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…


कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचं लक्षात घेऊन आता सरकारने हळूहळू अनलॉक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सलून सुरू झाले. एका सलूनमध्ये मात्र वेगळेच उद्योग सुरू झाले. नागपूर(Nagpur) जिल्ह्यातील चौकात एका सलूनमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. धक्कादायक म्हणजे सलूनमध्ये हे हा काळाधंदा राजरोजपणे सुरू होता.


पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची यातून सुटका केली आहे. इमामबाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सलूनमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या सलूनवर छापेमारी करून एका व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.


तर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची सुटका केली. धक्कादायक बाबा म्हणजे या प्रकरणात आरोपी महिलेचे नातेवाईकही सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी महिला आणि तिच्या नातेवाईकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group