Friday, March 29, 2024
Homeराजकीय घडामोडीशिंदे गटाकडून शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना; ‘या’ अभिनेत्याची अध्यक्षपदी वर्णी

शिंदे गटाकडून शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना; ‘या’ अभिनेत्याची अध्यक्षपदी वर्णी

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेवर त्यांनी दावा सांगितला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला बहाल केली.

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेवर त्यांनी दावा सांगितला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला बहाल केली. त्यानंतर अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असा दावा करणे चुकीचे आहे, असे अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आता शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा ठाकरे गट आणि शिंदे गटांतील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी शिंदे गटाचे सचिव व प्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांची शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. चित्रपट सेनेच्या नव्या कार्यकारिणीमध्ये निर्माते, लेखक, कलाकार आणि मनोरंजनसृष्टीतील मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेलार हे अलीकडेच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले होते.

शिंदे गटाच्या शिवसेना चित्रपट सेनेची कार्यकारिणी –
सुशांत शेलार – अध्यक्ष

राजेश भोसले – उपाध्यक्ष

शेखर फडके (सदस्य) केतन क्षीरसागर भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी, सरचिटणीसपदी योगेश शिरसाट, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, चिटणीसपदी अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सूर्यवंशी, वैभव विरकर आणि खजिनदारपदी शरद राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -