Friday, April 19, 2024
Homeतंत्रज्ञानInstagram Down : इन्स्टाग्रामची सर्व्हिस ठप्प; जगभरातील लाखो यूजर्स वैतागले!

Instagram Down : इन्स्टाग्रामची सर्व्हिस ठप्प; जगभरातील लाखो यूजर्स वैतागले!

इन्स्टाग्रामची सर्व्हिस रविवारी रात्रीपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे जगभरातील लाखो यूजर्स त्रस्त झाले आहेत. रात्रीपासून यूजर्स पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पोस्टच ( Post) जात नाही. लाईव्हही होत नाही. तसेच इतरांच्या मेसेजला केलेला रिप्लायही डिलिव्हर होत नाहीत. त्यामुळे हे यूजर्स वैतागले आहेत. रात्रीपासून जवळपास एक लाख 80 हजार यूजर्सने रिपोर्ट केलं आहे.Instagram Down

यूजर्सच्या सांगण्यानुसार त्यांना इन्स्टाग्राम ( Instagram) अॅप वापरण्यास अडचणीत येत होत्या. त्यामुळे यूजर्सना आधी नेटचा इश्यू वाटला. पण नेट सर्व्हिस व्यवस्थित सुरू होती. इतर अॅपही व्यवस्थित चालू होते. फक्त इन्स्टाग्रामलाच प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे या यूजर्सनी तात्काळ सोशल मीडियावरून तक्रार करण्यास सुरुवात केली. इन्स्टाग्राम सर्व्हिस ठप्प होण्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेतील यूजर्सना बसला आहे. Downdetector.com च्या नुसार अमेरिकेतील एक लाखाहून अधिक यूजर्सने तक्रार केली आहे. तर ब्रिटनमधील 56 हजार आणि कॅनडातील 24 हजार यूजर्सने रिपोर्ट केला आहे.Instagram Down

Downdetector.com नुसार, रविवारी एक लाख 80 हजार यूजर्सने रिपोर्ट केलं आहे. मेटाच्या प्रवक्त्याने ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असं स्पष्ट केलं. ग्राहकांना त्रास झाल्याबद्दल या प्रवक्त्याने यूजर्सची माफीही मागितली आहे. कंपनीने आऊटेजवर अधिक विवरणचा खुलासा केलेला नाही. मात्र, मेलचं उत्तर दिलं आहे.

यापूर्वी 18 मे रोजी सकाळी इन्स्टाग्रामची सर्व्हिस डाऊन झाली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर यूजर्सने रिपोर्ट केलं होतं. दरम्यान, भारतात तेव्हा इन्स्टाग्राम डाऊन झाला नव्हता. फक्त 34 टक्के यूजर्सना लॉग इन कनेक्शनमध्ये समस्या येत होती. या आधी जानेवारीतही इन्स्टाग्राम डाऊन झाले होते.Instagram Down

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -