लोकल फेऱ्यांमध्ये वाढ; मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणजे लोकल बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा होती. पण आता दुसरी लाट ओसरत असल्याचं लक्षात येताचं दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रोज मोठ्या अडणींचा सामना करत कार्यालय गाठणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य आणि पश्चिमरेल्वेवर सोमवारपासून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मध्यरेल्वे वर सोमवारपासून लोकलच्या 1 हजार 686 फेऱ्या होणार आहेत. आतापर्यंत 1 हजार 612 फेऱ्या सूरु होत्या. यामध्ये आता यामध्ये आता 74 फेऱ्यांची वाढ होणार आहे.


तर पश्चिम रेल्वे वर सोमवारपासून लोकलच्या 1 हजार 300 फेऱ्या होणार. आतापर्यंत याठिकाणी 1 हजार 201 फेऱ्या सुरू होत्या . यामध्ये आता यामध्ये आता 99 फेऱ्यांची वाढ होणार आहे. दरम्यान, 15 ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्याना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group