शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये चालू हंगामातील हापूस आंब्याची पहिली आवक झाली.रत्नागिरी येथील आंबा उत्पादक शेतकरी स्वप्नील तांबे यांच्या हापूस आंब्याची एक पेटी यासीन बालम बागवान यांच्या अडत दुकानात दाखल झाली.
आंब्याचा पहिला सौदा सोमवारी (ता. १६) सकाळी नऊ वाजता होणार आहे. हंगामातील पहिली आवक असल्याने या सौद्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी अडते, खरेदीदार व्यापारी, शेतकरी आणि अन्य संबंधित घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीने पत्रकाद्वारे केले आहे.
