Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाभारताची उद्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरिज, ‘असा’ असेल भारतीय संघ..

भारताची उद्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरिज, ‘असा’ असेल भारतीय संघ..

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडचा 1-0 असा पराभव केला आहे. महत्वाचं म्हणजे युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना उद्या (25 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग अमेझॉन प्राईम व्हिडिओवर होणार आहे. या एकदिवसीय मालिकेतही भारत न्यूझीलंडचा पराभव करणार का, यावर आता लक्ष असणार आहे.

भारताबद्दल एक फायद्याची गोष्ट म्हणजे यंदाच्या वनडे सीरिजमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची 3 सामन्यांतही विजय मिळवला तर भारत 3-0 ने ही सीरिज जिंकून आयसीसी क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचणार आहे. उद्या शुक्रवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी असून हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

संभाव्य भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

न्यूझीलंड संभाव्य संघ: केन विल्लियम्सन (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, ॲडम मिल्न, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -