Friday, April 19, 2024
Homeक्रीडारोनाल्डोवरील दोन सामन्यांची बंदी नव्या क्लबवर लागू राहणार

रोनाल्डोवरील दोन सामन्यांची बंदी नव्या क्लबवर लागू राहणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

फिफा वर्ल्ड कपचा रोमांच आता वाढू लागला आहे. पोर्तुगालचा कप्तान क्रिस्तियानो रोनाल्डो हा स्टार फुटबॉलर आणि त्यांचे लाखोनी चाहते. फिफा मध्ये गुरुवारी घाना विरुध्दचा पहिला सामना पोर्तुगालने जिंकून ३ गुण मिळविले आणि रोनाल्डोने पहिला गोल नोंदवून सलग पाच वर्ल्ड कप मध्ये गोल करण्याचे नवे रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंदविले. मात्र फुटबॉल असोसिएशनने रोनाल्डोवर दोन सामन्यांसाठी घातलेली बंदी आणि ५० हजार पौंडांचा दंड यांची चर्चा सुरूच आहे. त्यात रोनाल्डोने युनायटेड मँचेस्टर बरोबरचा करार संपुष्टात आणल्याची चर्चा होते आहे. अर्थात रोनाल्डोवरची दोन सामन्यांची बंदी फिफा साठी लागू नाही.



मिळालेल्या माहितीनुसार या वर्षातच एव्हर्टन विरुद्ध रोनाल्डोच्या टीमने ४ एप्रिल २०२२ रोजी सामना खेळला आणि त्यात १-० असा रोनाल्डोच्या टीमचा पराभव झाला. मैदानातून बाहेर पडताना रोनाल्डोच्या एक चाहत्याने त्याचा व्हीडीओ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा चिडलेल्या रोनाल्डोने त्याचा फोन हिसकावून घेतला आणि फोडून टाकला. त्याचे हे गैरवर्तन पाहून फुटबॉल असोसिएशन ने रोनाल्डोवर दोन सामन्यांसाठी बंदी घातली असून त्याला ५० हजार पौड दंड केला आहे.

रोनाल्डो जेव्हा नवा क्लब जॉईन करेल तेव्हा त्याच्यावरची ही दोन सामन्यांची बंदी अमलात येणार असल्याचे समजते. रोनाल्डोने या प्रसंगानंतर सोशल मिडीयावर चूक झाल्याचे मान्य करून माफी मागितली आहे. तो म्हणतो,’ अवघड प्रसंगी भावनांवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. तरी माझी चूक झाली.’ ज्या चाहत्याचा फोन फोडला त्याला ओल्ड ट्रॅफल्डवर एक सामना पाहायला येण्याचे निमंत्रण रोनाल्डोने दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -