Thursday, April 25, 2024
Homeतंत्रज्ञानजिओ कंपनी करणार मोठा धमाका; फेसबुक, इंस्टाग्रामला देणार आव्हान..

जिओ कंपनी करणार मोठा धमाका; फेसबुक, इंस्टाग्रामला देणार आव्हान..

जगात कित्येक असे अ‍ॅप आहेत, जे शॉर्ट व्हिडीओ, रील्स बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सध्याच्या काळात फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब अधिक वापरले जाणारे टिकटॉक नंतरचे ॲप्स आहेत. आता या स्पर्धेत भारतातील दिग्गज कंपनीने उडी घेतली आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आता मोठा धमाका करणार आहे.

जिओ कंपनीचा आता शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे जिओ दिग्गज कंपन्याना तगडे आव्हान देणार आहे. अशी माहिती मिळत आहे की, जिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या फीचर्सशी मिळते जुळते वैशिष्ट्य असणारे प्लॅटफॉर्म सादर करणार आहे. यासाठी कंपनीचे मोठे प्रयत्न चालू आहेत. हे ॲप कंपनी पुढील वर्षी सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कंपनीने मनोरंजनासाठी एक शॉर्ट व्हिडीओ ॲप प्लॅटफॉर्म लाँच करण्यासाठी भागीदारी आहे. हा प्लॅटफॉर्म पेड अल्गोरिदमऐवजी ऑरगॅनिक ग्रोथवर काम करेल. ज्यामुळे लोकांना त्यांच्या मेहनतीनुसार आणि प्रसिद्धी आधारित काही घटकांवर टिक्स मिळवतील. म्हणजेच प्लॅटफॉर्मवर युजर्सला त्यांच्या लोकप्रियतेनुसार सिल्व्हर, ब्लू आणि रेड देखील मिळतील.

जिओ कंपनीच्या या प्लॅटफॉर्मवर युजरला पैसे कमवण्याची संधीदेखील मिळणार आहे. कारण कंपनीकडून या प्लॅटफॉर्मवर युजरच्या किंवा निर्मात्याच्या प्रोफाईल मध्ये एक बुक नाऊ बटण देखील दिले जाणार आहे, ज्याद्वारे कोणीही एखाद्या कलाकार व निर्मात्याला बुक करू शकेल आणि अशा पद्धतीने कमाईची सुविधाही मिळेल. रोलिंग स्टोन्स इंडिया, क्रिएटिव्हलँड एशिया आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड यांनी यासाठी भागीदारी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -