Friday, March 29, 2024
Homeआरोग्य‘ही’ औषधे घेताय मग सावधान, सर्व राज्यांना पत्राद्वारे सूचना..

‘ही’ औषधे घेताय मग सावधान, सर्व राज्यांना पत्राद्वारे सूचना..

केंद्र सरकारने भारतीय औषध निर्मितीमध्ये असलेल्या समस्यांबाबत आता कडक पावलं उचलत मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर आता भारतीय औषध महानियंत्रक संस्था म्हणजेच डिसीजीआय ने काही बनावट औषधांपासून सावध राहण्याचा इशारा सर्व राज्यांच्या औषध निरीक्षकांना पत्र लिहून दिला आहे.

औषध महानिरीक्षक व्ही. जी. सोमानी यांनी त्या पत्रासोबत काही औषधांचाही उल्लेख केला आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या गोळ्या-औषधांचा यात समावेश आहे. अँटी अ‍ॅलर्जिक Montair, कार्डिओ ड्रग Atorva, Roseday, Zerodol तसेच कॅल्शिअमच्या सुट्या गोळ्या आणि डी जीवनसत्त्वाच्या बनावट गोळ्यांचा समावेश आहे.

हिमाचल प्रदेशच्या औषध महानियंत्रक संस्थेने यापूर्वीच दाखल केलेल्या तक्रारीवरून भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (DCGI) आता देशातील सर्व राज्यांना सर्व राज्यांना पत्र पाठवलं असल्याची माहीती आहे. बड्डी आणि आग्र्यात काही दिवसांपूर्वी पडलेल्या धाडींमध्ये ज्या बनावट औषधांचा साठा सापडला त्या औषधांबाबत सोमानी यांनी पत्रात उल्लेख केला आहे. ज्यात नामांकीत कंपनीची औषधे एका विना परवाना कंपनीत बनविले गेल्याचे समजले आहे.

दरम्यान देशात तपास आणि धाडी टाकण्यामागे काही महत्वाच्या घटनादेखील आहेत. नुकतेच उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (27 डिसेंबर) एक दावा केला ज्यात भारतीय कंपनी मेरियन बायोटेकचे डॉक 1 मॅक्स सिरप पिल्याने तेथील 18 मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चौकशी सुरू झाली आहे. यासोबतच त्यापूर्वीही गॅम्बियाने देखील ऑक्टोबरमध्ये एका भारतीय सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप भारतावर केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -