Thursday, April 18, 2024
Homeतंत्रज्ञानमारुती सुझुकीने आणली नवी Electric SUV; 550 किमी रेंज

मारुती सुझुकीने आणली नवी Electric SUV; 550 किमी रेंज

देशातील ऑटोमोबाईल जगतातील सर्वात मोठा इव्हेंट्स असलेल्या Auto Expo 2023 ला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली पहिली कॉन्सेप्ट Electric SUV eVX सादर केली आहे. ही सुझुकीने डिझाइन केलेली मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. 2025 पर्यंत ही कार मार्केटमध्ये येईल. चला जाणून घेऊया या गाडीचे खास फीचर्स….

गाडीच्या आकाराबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक SUV ची लांबी 4300मिमी , रुंदी 1800मिमी आणि उंची 1600मिमी आहे. सुजुकी मोटर कॉर्पोरेशन,जापान ने ही SUV डिझाईन केलेली आहे. यामध्ये समोरील बाजू पूर्णपणे पॅक आहे. कारमध्ये डायमंड कट मशीन अलॉय मिळतात जे खूपच ऍक्टिव्ह दिसत आहेत. याशिवाय समोरील बाजूस तळाशी सिल्व्हर स्किड प्लेटसह LED फॉग लॅम्प देखील मिळतात.

550 किमी रेंज –
या इलेक्ट्रिक कारमध्ये आरामदायी सुविधा आहेत. गाडीत सुरक्षित बॅटरी तंत्रज्ञान आणि एडवांस केबिन मिळते . मारुती सुझुकी eVX इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट SUV ला 60kWh चा बॅटरी पॅक मिळतो. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 550 किमी पर्यंत धावू शकते. मारुतीचा दावा आहे की या नवीन SUV मध्ये परफॉर्मन्ससह एडवांस्ड कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील. कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही उत्पादनासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -