Thursday, April 25, 2024
Homeनोकरीसरकारी नोकरीची सुवर्णसंधी; MPSC अंतर्गत 'या' पदांसाठी भरती जाहीर

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; MPSC अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

MPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जरी केली आहे.

या भरती अंतर्गत सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, उपसंचालक पदांच्या 42 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरायचा आहे. 23 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरती प्रकार – सरकारी

पद संख्या – 42 पदे

भरली जाणारी पदे –

सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी – 26 पदे
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी – 14 पदे
उपसंचालक – 2 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.
उपसंचालक: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.

असा करा अर्ज –

सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in

ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अर्ज भरताना याबाबतच्या सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
त्यांनतर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -