Friday, March 29, 2024
Homeनोकरीमेगाभरती, MPSC ची आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात, लगेच भरा अर्ज

मेगाभरती, MPSC ची आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात, लगेच भरा अर्ज

शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSC ने आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संकेतस्थळावर सहायक कक्ष अधिकारी पदाकरीता दिलेल्या माहितीत बदल करण्यात आला आहे. या पदाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू असल्याचे नमूद केले होते. मात्र, या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी लागू नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

तब्बल ८ हजार १६९ जागांची भरती

पदवी घेताना किंवा घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी MPSC ची तयारी रात्रंदिवस करतात. पंरतु आतापर्यंत मोठी भरती मोहीम निघाली नव्हती. आता गट-ब आणि गट-क संवर्गातील नोकऱ्यांसाठी तब्बल ८ हजार १६९ जागांची भरती निघाली आहे. ही भरती MPSC च्या नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. यासाठी गट-ब आणि गट-क मधील पदांसाठी संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा कधी असणार?

MPSCने तब्बल ८ हजार १६९ जागांची जाहिरात काढली आहे. त्यानुसार गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. यामुळे अभ्यासासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. राज्यातील ३७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. गट-ब सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.

गट-ब संवर्गातील तीन पदांसाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते.
सहाय्यक कक्ष अधिकारी(ASO) यांची ७० पदे
वित्त विभागातील राज्य कर निरीक्षक(STI)ची १५९ पदे
पोलीस उपनिरीक्षक(PSI) साठी ३७४ पदे
गृह विभागातील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Exise PSI)साठी फक्त ६ पदे
लिपिक टंकलेखक पदासाठी सर्वाधिक ७०३६ पदे आहेत.
परीक्षेसंदर्भात अर्ज भरणे व इतर माहितीसाठी https://mpsc.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -