Thursday, April 18, 2024
Homeकोल्हापूरमयत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मिळणार आता मोफत लाकडे आणि शेणी : निर्णय

मयत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मिळणार आता मोफत लाकडे आणि शेणी : निर्णय


उजगाव ; गावातील मयत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे आणि शेणी देण्याच्या निर्णयाबरोबरच येथील रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध होणार असून दर शनिवारी ग्रामपंचायत पटांगणात आठवडी बाजारही भरविण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी येत्या १० फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण व नवनिर्वाचित सदस्यांनी दिली.उचगाव ता.करवीर येथे २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेतील मागणीवरून अत्यंत जलद असे महत्त्वपूर्ण निर्णय उचगाव ग्रामपंचायतीने घेतले आहेत.
येथे महिन्याभरापूर्वी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. कॉंग्रेस-शिवसेना संयुक्त आघाडीची सत्ता या ग्रामपंचायतीवर विराजमान झाली.उपसरपंच निवडही पार पडली.त्यानंतर २६ जानेवारी २०२३ रोजी पहिलीच ग्रामसभा सरपंच मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेत उचगावच्या विकासकामांबरोबरच नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले.या प्रश्नांची तात्काळ दखल घेत अगदी दुसऱ्याच दिवशी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तीन महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याची घोषणा केली आहे.

येत्या १० फेब्रुवारीपासून गावात मयत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे आणि शेणी ग्रामपंचायतीकडून मोफत देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गावातील अत्यावश्यक रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची मोफत सेवाही सुरू करण्यात येणार आहे. गावापासून वीस किलोमीटरपर्यंत रुग्णांना ही सेवा मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेल्या आणि रोजच भरणाऱ्या भाजीमंडई व्यतिरिक्त गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला गावात विकला जावा यासाठी ग्रामपंचायत पटांगणात दर शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून आठवडी बाजार भरणार आहेया तिन्ही महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी येत्या १० फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. माजी सरपंच कावजी कदम यांनी गावच्या सर्वांगीण विकासातील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही सांगत पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

उपसरपंच विराग करी, सदस्य राहूल मोळे, संदीप पाटील, तुषार पाटील, श्रीधर कदम, अरविंद शिंदे, संदीप कुंभार, तलहा मणेर, सौ. सुनिता चव्हाण, सौ. शिवानी पाटील, सौ. सावित्री खांडेकर, शिला अनिल यादव,
मोरे आदी सदस्य तसेच माजी सरपंच कावजी कदम, महेश जाधव, दिनकर पोवार, राजू यादव, गुरुदेव माने, मधुकर र. चव्हाण, विक्रम चौगुले, विनायक हावळ, सूरज पाटील उपस्थित होते. आभार दत्तात्रय यादव यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -