Wednesday, April 10, 2024
Homeक्रीडाटी-20 सिरीज वाचवण्यासाठी Hardik Pandya टीममध्ये करणार मोठे बदल; 'या' 2 खेळाडूंना...

टी-20 सिरीज वाचवण्यासाठी Hardik Pandya टीममध्ये करणार मोठे बदल; ‘या’ 2 खेळाडूंना देणार डच्चू?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये दुसरा टी-20 सामना रविवारी खेळवला जाणार आहे. रांचीमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. किवींना भारताला 12 रन्सने मात दिली. अशातच 3 सामन्यांच्या या सिरीजमधील आजचा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ अशा परिस्थितील आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होणार असून आजच्या या सामन्यात टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या मोठे निर्णय घेऊन टीममध्ये बदल करू शकतो.

दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 वर भारतीय चाहत्यांची नजर असणार आहे. हार्दिक पंड्या सिरीज वाचवण्यासाठी टीममध्ये कोणते बदल करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दीपक हुड्डाला (Deepak Hooda) मिळू शकतो डच्चू!
लोअर मिडल ऑर्डर फलंदाज दीपक हुड्डा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत नाहीये. त्याच्या जागी विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा याला टीममध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. जितेश शर्माने यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून चांगली खेळी केली होती. हिटर म्हणून पंजाब किंग्जच्या ताफ्यात त्याची ओळख आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यात त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

अर्शदीपला पुन्हा मिळणार संधी?
पहिल्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंग भारतासाठी फारच महागडा ठरला होता. त्याने चार ओव्हर्समध्ये पन्नासहून अधिक रन्स दिले होते. मात्र असं असूनही हार्दिक पांड्या दुसऱ्या टी-20 सामन्यात या युवा वेगवान गोलंदाजावर विश्वास ठेवू शकतो.

पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता!
शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचे टॉप 3 बॅट्समन फेल गेले. शुभमन गिल (Shubhaman Gill) सोबत ओपनिंगला आलेला इशान किशनने केवळ चार धावा केल्या. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्येही इशानने अपेक्षित कामगिरी केली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याने फक्त 40 धावा केल्या. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पंड्या दुसऱ्या टी-20 सामन्यात स्टार सलामीवीर पृथ्वी शॉला संधी देऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -