Saturday, April 20, 2024
Homenews१२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण ऑक्टोंबरपासून

१२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण ऑक्टोंबरपासून


कोरोना लसीकरणात एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे १२ वर्षावरील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून १२ वर्षांवरील मुलांना लस मिळणार आहे.
कोरोना लसीकरण मोहिमेत प्रथम गंभीर आजार असलेल्यांना लस प्राधान्यांने देण्यात आली. तीच पद्धत लहान मुलांच्या लसीकरणाबाबत वापरण्यात येणार आहे.


सध्या देशात १२ ते १८ वयोगटातील १२ कोटी मुले आहेत. सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल.
डीसीजीआय कडून यासाठीची परवानगी मिळाली आहे.


ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.
सरकारच्या कोविड १९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा म्हणाले, ‘भारतात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत.


त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात, असा अंदाज आहे.
त्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याची शक्यता नाही.


आम्ही मुलांना लसीकरण सुरू करण्यापूर्वी या १८ ते ४५ गटाचे लसीकरण करण्यास प्राध्यान्य देत आहोत. १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण त्यानंतर सुरू हाोईल.
शाळेसाठी लसीकरणाची गरज नाही
डॉ. अरोरा म्हणाले , देशात १८ वर्षांखालील सुमारे ४४ कोटी मुले आहेत.


मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शाळा पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.
मुले शाळेत जाऊ शकतात. लसीकरणाची गरज नाही. पण ती सुरक्षित असायला हवी. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षेची एक ढाल तयार करणे आवश्यक आहे.
म्हणूनच त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी याचं लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सध्या १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीचा पुरवठा पुरेसा नसल्याने लसीकरणात अडथळे येत आहेत.
सध्या को विन ॲपवर नोंदणी करून लस घ्यावी लागते. मात्र, लसीकरण नोंदणीचा कालावधी अल्प असल्याने त्यात अडथळे येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -