Friday, June 2, 2023
Homeमनोरंजनसलमान खान आणि पूजा हेगडे एकमेकांच्या प्रेमात..?; अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

सलमान खान आणि पूजा हेगडे एकमेकांच्या प्रेमात..?; अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. या चित्रपटात सलमान खानचा साऊथ लूक पहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे यांची रोमॅंटिक केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सलमान आणि पूजा एकत्र स्पॉट होत आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्येही हजेरी लावली होती. यानंतर सलमान आणि पुजा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे पूजा हेगडेने आता या अफेअरच्या चर्चांवर खुलासा करताना मौन सोडले आहे.

अभिनेत्री पुजा हेगडेने नुकतीच एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली. ज्यामध्ये तिने सलमान खानसोबत अफेअर चालू असल्याच्या चर्चांविषयी खुलासा केला आहे. या चर्चा अफवा आहेत कि सत्य..? असे विचारले असता अभिनेत्री पूजा हेगडेने सांगितले कि, ‘आता मी काय बोलू. मी ही माझ्याबद्दलच्या या बातम्या वाचल्या आहेत. पण तसं काही नाही. मी सिंगल आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. सध्या मी पूर्णपणे माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. मला एका शहरातून दुसऱ्या शहरात काम करायचे आहे. अशा अफवांवर मी काहीही बोलणार नाही. कारण ते केवळ बिनबूडाच्या अफवा आहेत.’ इतकेच नव्हे तर सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव देखील तिने शेअर केला आहे.

सलमानसोबत काम करतानाचा अनुभव शेअर करताना पूजा हेगडे म्हणाली कि, ‘सलमान खान यांनी २०१६ साली प्रदर्शित झालेल्या माझ्या ‘मोहनजोदड़ो’ चित्रपटातील माझे काम पाहिले होते आणि त्यानंतर आपण लवकरच एकत्र काम करू असे म्हटले होते. त्यामुळे जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर आली मी स्वत:ला अजिबातच रोखू शकली नाही. या चित्रपटात मी जी व्यक्तिरेखा साकारत आहे ती माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण या चित्रपटात मी एका तेलुगू मुलीची भूमिका साकारते आहे.

ज्यामुळे ही भुमिका साकारणं माझ्यासाठी थोडं सोपं होतं’. ‘किसी का भाई किसी कि जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये सलमान खान, पूजा हेगडे यांच्याशिवाय व्यंकटेश दग्गुबती, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, राघव जुयाल आणि विनाली भटनागर हे कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group