सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा तपास सुरू असताना विश्रामबाग परिसरातील 100 फुटी रोडवरील धामणी चौक या ठिकाणी चोरीतील मोटरसायकल विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली
सांगली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ दुचाकीसह दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करण चव्हाण वय (26) असे या संशियताचे नाव आहे. त्याच्याकडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता सांगली पोलिसांनी व्यक्त केली आहे.