मंगरायाची वाडी परिसरात तीन वन्य गव्यांचे दर्शन


येथील मंगरायाची वाडी परिसरात तीन गव्यांचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वडगाव नगरपालिका प्रशासनाने कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. मोहनलाल माळी यांनी केले आहे.


पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोहिते सूतगिरणीच्या उत्तर भागात तीन वन्य गवे रेडे फिरत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान उपाध्ये यांनी जवळच्या नागरिकांना बोलवून रेड्यांना नागरी वस्तीपासून उसकावून लावले.


मात्र तीन गवे मंगरायाची वाडीच्या दिशेने गेले. परिणामी मंगरायाचीवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्य गव्यामुळे कोणतेही जीवित हानी होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.


तसेच वन्य गव्याना पकडण्यासाठी वन विभागाला पाचारण करण्यात आले असे नगराध्यक्ष डॉ. माळी यांनी सांगितले.

Leave a Reply

Join our WhatsApp group