शौमिका महाडिकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर..


सैनिक टाकळी(senik takli) येथील बल्क मिल्क कुलर बंद का होत आहे. यातील दुधाची प्रत कमी लागते. मग युनिट चालक प्रत वाढवून देत नाही. हे बघण्याचे काम युनिट चालक की संस्थेचे, मग ही तक्रार संस्थेची कशी असू शकते, तुमचे दौरे कसले, सुफरवाझर तपासणीसाठी जातात का? कँनवर कोड दिसत नाही, मग हे सगळं बघण्याचे काम कुणाचे असे सर्व मुद्दे उपस्थित करून गोकुळाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी उदगाव सेंटर मधील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

उदगाव (ता. शिरोळ) येथील गोकुळ दूध संघाच्या चिलिंग सेंटरला संचालिका शौमिका महाडिक यांनी अचानक भेट दिली. सैनिक टाकळी ता. शिरोळ येथील बल्क मिल्क कुलर का बंद केला जात आहे. यामध्ये काय अडचणी आहेत.

शौमिका महाडिकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
तसेच कामांमधील त्रुटींवरून अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौमिका महाडिक यांनी धारेवर धरले. शौमिका महाडिक यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली होती.
सुफरवाझर यांना सैनिक टाकळी येथील बल्क मिल्क कुलर सेंटरवर बोलविल्यानंतर ते का येत नाहीत. अशाप्रकारे काम होत असेल तर खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, जोतिराम जाधव, अभिदून मुजावर, सुमित यळगुडे, सेंटरचे ईचार्ज एस.व्ही.जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group