लॉकडाऊन लागणार नाही ( पंतप्रधानाची मुख्यमंत्र्यांच्या बैठकी प्रसंगी ग्वाही

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशभरातील ३० राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधला.

शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा आपण सामना करत आहोत. लढाईचे तिसरे वर्ष सुरू झाले आहे. ही लढाई यापुढेही निकराने लढावी लागणार आहे. त्याला पर्याय नाही. महामारीवर मात हे आपले एकमेव लक्ष्य असले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना केले.

Open chat
Join our WhatsApp group