Friday, March 29, 2024
Homeजरा हटकेमोबाईल, सोशल मीडियामुळे घटस्फोट वाढले

मोबाईल, सोशल मीडियामुळे घटस्फोट वाढले

ताजी बातमी ऑनलाइन टीम

मोबाईल आणि सोशल मीडिया पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात राज्यात 25 हजारांहून अधिक घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आले आहेत. त्यापैकी 35 टक्के प्रकरणांत घटस्फोटासाठी मोबाईल अथवा सोशल मीडियाचे कारण पुढे करण्यात आले आहे. एकट्या मुंबईत 2021 या वर्षभरात 7 हजार, तर पुण्यात 12 हजार अर्ज घटस्फोट साठी दाखल करण्यात आले आहेत.

ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहणारे सीमा आणि प्रशांत (नावे बदललेली) दोघेही चांगले उच्चशिक्षित आणि नोकरी करणारे सुखी दाम्पत्य.

प्रशांत एका मल्टिनॅशनल कंपनीत पीआर हेड पदावर कार्यरत आहे. तर सीमा एका जाहिरात कंपनीत जॉब करते. सीमा आणि प्रशांतचा संसार सुरळीत सुरू असतानाच एका रात्री त्यांच्या आयुष्यात अचानक एक वादळ आले. सीमाने त्या रात्री अचानक प्रशांतचा मोबाईल चेक केला. त्यात तिला दिसले की, प्रशांत आपल्याच कार्यालयातील एका महिला सहकारीशी व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅट करत असताना त्याने त्या महिला सहकारीला फ्लाईंग किसचे स्माईली पाठवले आहे. तू त्या महिलेला फ्लाईंग किसचे स्माईली का पाठवले, या कारणावरून सीमा आणि प्रशांतमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

एका महिला सहकारीला कोणीही फ्लाईंग किसचे स्माईली उगाच कसे पाठवू शकतो, असे म्हणत सीमाच्या डोक्यावर संशयाचे भूत दबा धरून बसले. त्या एकाच कारणावरून सीमा प्रशांतवर सतत संशय व्यक्त करायला लागली. तर याबाबत प्रशांतचे म्हणणे होते की, त्याच्या महिला सहकारीने त्या दिवशी एक जोक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता व तो जोक त्याला आवडला, असे दाखवण्यासाठी त्यास खळखळून हसण्याचे स्माईली तिला पाठवायचे होते.

मात्र, हसण्याच्या आणि फ्लाईंग किसच्या स्माईलीमधला फरक माहिती नसल्याने आपण हसण्याच्याऐवजी फ्लाईंग किसचा स्माईली तिला पाठवला. हसण्याचा स्माईली कोणता आणि फ्लाईंग किसचा कोणता याची माहिती नव्हती एवढीच काय आपली चुकी असल्याचे प्रशांत सीमाला समजावून सांगत होता. परंतु, सीमा काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -