घरच्या घरी कोरोना बाधित ठणठणीत

देशासह राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला असून जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्क्यांवर असला तरी जिल्हावासीयांना घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही.

‘पुढारी’ने याची गांभीर्यता पडताळून पाहण्यासाठी कोरोना आकडेवारीचे ‘टेक्निकल अ‍ॅनालिसिस’ केले असता प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आलेे. गेल्या 12 दिवसांत जिल्ह्यात 4 हजार 826 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील फक्त 184 जण हॉस्पिटलमध्ये दाखल असून पैकी केवळ चौघे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे एकूण बाधितांपैकी अवघे 3.81 टक्के रुग्ण अ‍ॅडमिट होत असून अनेक बाधित हे घरच्या घरी ठणठणीत होत आहेत.

ओमायक्रॉन आला, ओमायक्रॉन आला आता पॉझिटिव्ह रेट वाढू लागला. मात्र, ‘पुढारी’ने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतील आकडेवारीचा धांडोळा घेतला असता परिस्थिती पहिल्या किंवा दुसर्‍या लाटेइतकी भीषण नसल्याचे चित्र आहे. तरीही जिल्हावासीयांनी कोरोना नियम पाळणे अत्यंत गरजेचे व आवश्यक बनले आहे.

Open chat
Join our WhatsApp group