Friday, March 29, 2024
Homeजरा हटकेनर्सनं असं काही केलं की चक्क लकवाग्रस्त रुग्ण नाचू लागला

नर्सनं असं काही केलं की चक्क लकवाग्रस्त रुग्ण नाचू लागला

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, असे मानले जाते. ”रुग्ण जेव्हा उपचारानंतर बरा होतो तेव्हा सगळे डॉक्टर्संना धन्यवाद देतात. पण नर्सेस आणि अन्य मेडिकल स्टाफ ज्या मेहनतीने उपचार करतात त्यांच्यासाठी ‘धन्यवाद’ हा शब्द छोटा शब्द असतो.” अशी कॅप्शन दिलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओ मध्ये फिजिओथेरपी दरम्यान रुग्णालयातील नर्स एका अर्धांगवायू/लकवा मारलेल्या रुग्णाला हाताची हालचाल करण्याचे प्रात्यक्षिक चक्क डान्स करत दाखवते.

फिजिओथेरपी दरम्यान व्यायाम हा एका विशिष्ट पद्धतीने करायचा असतो. त्यात अर्धांगवायू रुग्णांच्या शरिराच्या हालचालीत सुधारणा करण्याचे काम फिजिओथेरपीच्या माध्यमातून केले जाते. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका रुग्णाला नर्स अगदी उत्साहाने नाचत फिजिओथेरपीचा व्यायाम शिकवत आहे. नर्सने अर्धांगवायू रुग्णाला अभिनव पद्धतीने काही व्यायाम करायला लावल्याचे व्हिडिओत दिसते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -