राहत्या घरात गळफास घेऊऩ तरूणाची आत्महत्या

शिरसोली येथील ३३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केलीय. आज २८ जानेवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीष पाटील हा आई वडील, पत्नी आणि भाऊ यांच्यासह शिरसोली येथे वास्तव्याला आहे. गेल्या १३ वर्षांपासून तो बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला आहे. गुरूवारी २७ जानेवारी रोजी रात्री त्याने कुटुंबियासह जेवण करुन तो झोपी गेला. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना मागच्या खोलीत गिरीष प्रकाश पाटील (वय-३३) याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

Join our WhatsApp group