Friday, March 29, 2024
Homeक्रीडागूड न्यूज… भारतीयांसाठी आली आनंदाची बातमी!

गूड न्यूज… भारतीयांसाठी आली आनंदाची बातमी!

ताजी बातमी ऑनलाइन टी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेता ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पण हा दौरा सुरु होण्यापूर्वीच भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका कोलकता येथील इडन गार्डन्सवर होणार आहे. या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आता चाहत्यांसाठी एक गूड न्यूज आहे. कारण या मालिकेसाठी आता प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात येणार आहे. इडन गार्डन्सच्या क्षमतेच्या ७५ टक्के प्रेक्षकांना हा सामना पाहता येणार आहे. त्यामुळे जवळपास ५० हजार चाहत्यांना हा सामना थेट पाहता येणार आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याच्या शहरात ही मालिका होणा आहे. त्यापूर्वी बंगालच्या सरकारने चाहत्यांना आता आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे आता इडन गार्डन्सवर किती प्रेक्षक सामना पाहायला उपस्थित राहतात, याची उत्सुकता सर्वांना असेल.

कोहलीने मालिकेपूर्वी घेतला बीसीसीआयशी पंगा…
गेल्या काही दिवसांतच विराटसाठी होत्याचे नव्हते होऊन बसले आहे, कारण भारताच्या तिन्ही संघांचे कर्णधारपद आता कोहलीकडे राहिलेले नाहीत. कोहलीने बीसीसीआय आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी पंगा घेतला. त्यामुळे आता त्याच्याकडे एकही कर्णधारपद नाही, पण असे असले तरी कोहलीने बीसीसीआय आणि गांगुली यांना डिवचण्याची मोठी संधी सोडलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी विराटने एक मोठे विधान करत धक्का दिला आहे.

विराट यावेळी म्हणाला की, ” तुम्हाला नेता म्हणून कर्णधार असण्याची गरज नाही.” या गोष्टीचा अर्थ असा होतो की, जरी माझ्याकडे कर्णधारपद नसले तरी मीच संघाचा नेता असेल. मैदानात काय करायचे आणि काय नाही, कर्णधारपद नसतानाही मी ठरवू शकतो. त्यामुळे जर माझ्याकडे कर्णधारपद नसले तरी मी संघाचा लीडर होऊ शकतो. विराटच्या या बोलण्यामुळे आता भारतीय संघात एक समांतर सत्ताकेंद्र असल्याचे पाहायला मिळू शकते. कारण रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व असले, तो कर्णधार असला तरी मात्र कोहली आपला रुबाब कायम ठेवून असेल. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो भारतीय संघात किती ढवळाढवळ करतो, हे पाहावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -