Friday, April 19, 2024
Homeआरोग्यविषयकआंबा खाण्यापूर्वी नक्कीच भिजवून घ्या पाण्यात; त्यामागील वैज्ञानिक कारण आहे महत्वाचे

आंबा खाण्यापूर्वी नक्कीच भिजवून घ्या पाण्यात; त्यामागील वैज्ञानिक कारण आहे महत्वाचे

उन्हाळा म्हटलं की आपोआपच आपल्याला आंबा आठवतो. बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारची फळे नियमित उपलब्ध असतात. पण आंब्याला मात्र या फळांचा राजा मानला जातो. विशेष म्हणजे तो खायला सोपा असल्या कारणाने लहान मुले, तरुण, वयस्कर सर्वजण आनंदाने व आवडीने खातात. त्यामुळे हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे.

आपल्याकडे खूप वर्षांपासून..अगदी आठवतही नाही तेव्हापासून.. आंबा खाण्यापूर्वी तो किमान अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवण्याची खास पद्धत आहे. कधी विचार केलाय का? की का बरं आंबा खाण्यापूर्वी तो भिजवून ठेवला जात असेल ? यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का ?
नक्कीच आहे .. चला तर मग आज यामागे असलेले वैज्ञानिक कारण जाणून घेवु या

वैज्ञानिकांच्या मते, पाण्यात भिजवलेले फळे खाल्ल्यांनी बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी, जुलाब यासारख्या समस्या कमी होतात. सर्वच फळे आणि भाज्यांमध्ये काही प्रकारचे थर्मोजेनिक गुणधर्म असतात जे शरीराच्या कार्यावर परिणाम करतात. आंबा हे एक उष्ण फळ आहे. ज्यामुळे शरीराचे तापमान वाढून थर्मोजेनेसिस हा आजार होवू शकतो.
आंबा भिजवल्या नंतर त्याच्यातील थर्मोजेनिक गुणधर्म कमी होतात. तसेच आंब्याच्या सालीवरील कीटकनाशके आणि नको असलेली रसायने काढून टाकण्यासाठी आंबा पाण्यात भिजवणे आवश्यक आहे. आंबा पाण्यात न भिजवता तसाच खाल्ला तर हे कारण कर्करोगाच्या पेशींच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते.

त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी तो साधारण पंधरा ते तीस मिनिटे पाण्यात भिजवावा. त्यामुळे त्याच्यातील उष्णता बाहेर पडते. व तो खाल्ल्यानंतर आरोग्यास काही अपाय होत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -