Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाKKR vs LSG IPL 2022: रोमांचक सामन्यात लखनऊ 2 धावांनी विजयी, कोलकाता...

KKR vs LSG IPL 2022: रोमांचक सामन्यात लखनऊ 2 धावांनी विजयी, कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शेवटपर्यंत रंगलेल्या लखनऊ (LSG) विरुद्ध कोलकाता (KKR) सामन्यात क्षणोक्षणी दोन्ही संघांचे परडे आलटून पलटून जड होत होते. आंद्रे रसेल (Andre Russell) बाद झाल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र त्यानंतर रिंकू सिंगने (Rinku Singh) 15 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या, तर सुनील नरेनने (Sunil Narine) 7 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 21 धावा करून सामना पलटवला. केकेआरला शेवटच्या षटकात विजयासाठी 21 धावांची गरज होती. तेव्हा रिंकू सिंगने ओव्हरच्या पहिल्या तीन चेंडूत चौकार, षटकार आणि षटकार ठोकत लखनऊच्या तोंडून घास हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर षटकाच्या 5व्या चेंडूवर एव्हिन लुईसने त्याचा सर्वोत्तम झेल टिपला आणि केकेआरच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या.



प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाताला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र अवघ्या 2 धावांच्या पराभवाने त्यांचे हे स्वप्न भंगले. दुसरीकडे सलग दोन पराभवांनंतर लखनऊने जबरदस्त विजय नोंदवत 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली होती. व्यंकटेश अय्यर (0) आणि अभिजित तोमर (4) लवकर बाद झाले. त्यानंतर नितीश राणा (42) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (50) यांनी डाव पुन्हा रुळावर आणला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -