Thursday, April 25, 2024
Homeसांगलीशिरढोण येथे गोळीबार करत चोरट्यांकडून एटीएम लंपास

शिरढोण येथे गोळीबार करत चोरट्यांकडून एटीएम लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

२२ लाख ३४ हजार रुपयांवर डल्ला; कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ सांगली: कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण या गावामध्ये शनिवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास येत गोळीबार करून चार अज्ञात चोरट्यानी महाराष्ट्र बैंकेचे एटीएम मशिन २२ लाख ३४ हजार रुपयासह बोलेरो गाडीतून उचलले गायान भर वस्तीत असणान्या एटीएमदर चोरटयांनी इस्ला मारल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.



पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूरनागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठे महा काळ तालुक्यातील शिरडोण हे गाव असून गावातील अर्जुन निकम यांच्या मालकीच्या गाळ्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम आहे. जवळच त्यांचा बेकरीचा व्यवसाय असून बेकरीच्या गाळ्यावर कटूंबासोबत ते राहतात. शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चार चोरटे बोलेरो गाडीमधून एटीएम सेंटर जवळ आले. त्यांनी एटीएम सेंटर मध्ये असणान्या सीसीटीव्ही कॅमेरावर कलरचा स्प्रे मारून तो बंद केला. त्यानंतर थेट एटीएम मशिन उचकटन औदत किन जाऊ लागले..

चोरी करत असताना दुसऱ्या मजल्यावरील घरमालक अर्जुन विठ्ठल निकम यांना जाग आली. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने दगड टाकला. परंतु या चोरट्यानी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. घरमालक निकम यांनी भीतीने दार लावून घेतले. ही गोळी दुसऱ्या दिशेने गेल्याने ते बचावले. गोळीच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जागे होईपर्यंत चोरट्यांनी एटीएम मशिन बोलेरोमध्ये ठेवत पोबारा केला. या मशिनमध्ये २२ लाख ३५ हजारांची रोकड होती. निकम यांनी या घटनेची माहिती तातडीने कवठेमहाकाळ पोलिसांना दिली. या एटीएम सेंटर(ATM machine) मध्ये दोन मशिन होत्या. त्यातील दुसरे मशिन नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम अपर पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले, जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, श्रीमती अश्विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक रामायर यांनी तातडीने भेट दिली. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले. परतू थोड्या अंतरावर जाऊन तिथेच घुटमळत राहिले. फॉरेन्सिक लॅब व उसे तज्ञांना सुध्दा पाचारण करण्यात आले होते. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -