Thursday, April 25, 2024
Homeब्रेकिंग'ज्ञानवापी'ची संपूर्ण जागा काशीविश्वनाथ मंदिराची : हिंदू पक्षाचा दावा

‘ज्ञानवापी’ची संपूर्ण जागा काशीविश्वनाथ मंदिराची : हिंदू पक्षाचा दावा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

ज्ञानवापी मशिदीची संपूर्ण जागा ही काशीविश्वनाथ मंदिराची आहे, असा दावा हिंदू पक्षाने केला आहे. यासाठी ब्रिटिश काळातील एका निवाड्याचा हवाला हिंदू पक्षाने दिला आहे. पूजेच्या अधिकाराची मागणी करणाऱ्या पाच हिंदू महिलांनी त्यांचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या माध्यमातून हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.



अंजूमन इंतजामिया मस्जिद व्यवस्थापन समितीने मशिदीतील सर्वे रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेला उत्तर देताना हिंदू पक्षाने हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, “ही जागा वक्फ बोर्डची नाही, अशी भूमिका ब्रिटिशांनी घेतली होती. त्यामुळे ही मशिद आहे, असा दावा मुस्लीम पक्ष करू शकत नाही.”
प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “इतिहासकार मान्य करतात की
औरंगजेबने आदी विश्वेश्वराचे मंदिर पाडण्याचे फर्मान ९ एप्रिल १६६९ला काढले होते; पण त्यानंतरच्या काळात ही जागा वक्फला हस्तांतरीत करण्याचे कोणतेही फर्मान कुठल्याही राजाने काढल्याचे पुरावे नाहीत. “जी जागा वक्फची आहे, त्याच जागेवर मशिद उभी करता येते. ज्या जागेवर पूर्वी मंदिर होते अशा जागेवर कोणत्याही राजाला किंवा मुस्लिम व्यक्तीला मशिद उभी करता येत नाही,असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -