Thursday, April 25, 2024
Homeब्रेकिंगबेळगाव गेट झोपडपट्टीला मिळाली २ महिन्याची मुदतवाढ..! नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नांना...

बेळगाव गेट झोपडपट्टीला मिळाली २ महिन्याची मुदतवाढ..! नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नांना यश..!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बेळगाव गेट येथे झोपडपट्टी आहे ही झोपडपट्टी मध्ये ५० कुटुंबीयांची घरे आहेत.ही घरे पाडून येथून रेल्वे उड्डाणपूल होणार आहे.ही झोपडपट्टी काढण्यासाठी एप्रिल महिन्याची मुदत होती.नंतर नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी रेल्वे प्रशासनाकडून ही झोपडपट्टी येथील नागरिकांचे पुनर्वसन होऊदे यासाठी १ महिन्याची मुदतवाढ घेतली होती.ही मुदतवाढ २३ मे पर्यंत दिली होती.पण नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी यावर प्रश्न करत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना या ठिकाणी घेऊन येऊन येथील नागरिकांचे पुनर्वसन करावे यासाठी बैठक घेतली.

या अनुषंगाने आज ही झोपडपट्टी पाडण्यात येणार होती.पण पालकमंत्री जयंत पाटील यांना महापौर यांनी कळविले.तात्काळ रेल्वे अधिकारी यांच्याशी पालकमंत्री जयंत पाटील आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बैठक घेऊन ह्या झोपडपट्टी आणि नागरिकांचे पुनर्वसन यासाठी अजून दोन महिन्याची मुदतवाढ मागून घेतली.आज रेल्वे प्रशासनाने या झोपडपट्टी साठी पुन्हा दोन महिन्याची मुदतवाढ दिली.तर या दोन महिन्यांमध्ये येथील नागरिकांचे पुनर्वसन करुन देणार असा नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विश्वास व्यक्त केला.या नागरिकांसाठी झटून नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मुदतवाढ आणली यासाठी नागरिकांनी योगेंद्र थोरात यांचा हार घालून सत्कार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -