खराब प्रकाशामुळे वेळेच्या आधीच खेळ समाप्त

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. आज कसोटी मालिकेचा पहिला दिवस होता. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाची करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयनं कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला आराम  करण्याची संधी दिलीय. तर विराट कोहली दुसऱ्या  मॅचमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व करेल. आजच्या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरनं कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे. खराब प्रकाशामुळे आजचा भारताचा खेळ संपला आहे. आजचा दिवस भारतासाठी चांगला राहीला. चार गडी गमवून भारताने एकूण 258 धावा केल्या. श्रेयश अय्यर आणि रविंद्र जाडेजा अजूनही नाबाद आहेत. श्रेयसने धामाकेदार खेळ करत अर्धशतक झळकावलं आहे. अय्यरने पहिल्या दिवशी 75 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे जाडेजानेदेखील 50 धावा केल्या असून तोही मैदानात पाय रोवून आहे.

Open chat
Join our WhatsApp group