Thursday, March 28, 2024
Homeअध्यात्मसंत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; देहूमध्ये 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत...

संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान; देहूमध्ये 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यार आहे. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी देहू संस्थानकडून (Dehu Sansthan) जय्यत तयारी करण्यात आली आहे. तुकोबांच्या पालखीचा यंदा 337 वा पालखी सोहळा (337th Palkhi Sohala) आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे.

दरम्यान, आज पहाटेपासून देहू येथील मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिरात अभिषेक संपन्न झाला आणि नंतर पहाटे पाच वाजताअभिषेक महापुजा करून पांडुरंगाची आरती करण्यात आली. यावेळी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती पार पडली. यानंतर संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादूकांचा अभिषेक आणि विधिवत पूजा करण्यात आली.

दरम्यान आज दिवसभर देहूनमध्ये अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी नऊ ते अकरा वाजेदरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर रामदास महाराज मोरे यांचे कीर्तन होईल. दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तुकोबांचा प्रस्थान सोहळा सुरू होईल. त्यानंतर पाच वाजता पालखी प्रदक्षिणा सुरू होईल. सायंकाळी सहा वाजता तुकोबांची पालखी इनामदार वाड्यात मुक्काम करेल आणि रात्री नऊ वाजता किर्तन आणि जागरणाचा कार्यक्रम पार पडेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -