Thursday, April 25, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

कोल्हापूर ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, २ मुली असा परिवार आहे.



चंद्रकांत पाटील हे दुपारी कोल्हापुरात आले होते. आज त्यांची भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत सायंकाळी सहा वाजता बैठक होते. त्यापूर्वी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मात्र बैठकीला जाण्यापूर्वी आपण आईंना भेटून येतो असे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर ते आईला भेटण्यासाठी संभाजीनगर येथील निवासस्थानी गेले. आईंना भेटल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी निघतानाच त्यांच्या मातोश्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -