Thursday, April 18, 2024
Homeआरोग्यपावसाळ्यात स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांचा वापर करून दूर ठेवा संसर्गजन्य आजार

पावसाळ्यात स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून दूर ठेवा संसर्गजन्य आजार



सध्या पावसाळा सुरू आहे. सर्वत्र जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस दाखल झाला आहे. पावसासोबतच हिरवागार निसर्ग आणि वाहती हवा आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याचा हा ऋतू आहे. मात्र या ऋतूत काही संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. त्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. पावसाळ्यामुळे ताप, सामान्य सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासह हवेतून विविध प्रकारचे संसर्ग होतात. मात्र तुमच्या किचनमध्ये असलेल्या काही पदार्थांचा उपयोग करून तुम्ही हे संसर्गजन्य आजार दूर ठेऊ शकता.

तुमच्या किचनमध्ये असलेले आले देखील आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. पावसाळ्यात सर्दी, घसा खवखवणे आणि खोकल्याच्या समस्येशी लढण्यासाठी आले हा सर्वात प्रबावी घटक आहे. आल्यातील अँटी-इम्फ्लामेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुधारते आणि तणाव व चिंता कमी होते. तुम्ही चहामध्ये थोडे आले ठेचून टाकू शकता आणि पावसासोबत त्याचा आनंद घेऊ शकता.

तुमच्या किचनमध्ये लसूण देखील असाच एक सुपरफूड आहे. लसणामध्ये असलेला अॅलिसिन नावाचा घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो. यामुळे पावसाळ्यात लसूण खाल्ल्याने विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांपासून आपले संरक्षण होऊ शकते.

तुमच्या किचनमधील जिरे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रक्तसंचय दूर करण्यासाठी आणि श्लेष्मा पातळ करण्यासाठी जिरे खूप उपयोगी असतात. सर्दी झाली असेल तर तुमच्या डाळीत भरपूर जिरे घाला. याशिवाय तुम्ही उकळत्या पाण्यात एक किंवा दोन चमचे जिरे टाकून शकता आणि ते पाणी एका बाटलीत साठवून दिवसभर पिऊ शकता.

तुमच्या किनचमधील काळी मिरी देखील खूप आरोग्यदायी असते. यातील कार्मिनिटिव्ह घटक आतड्यांतील वायू आणि इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या दूर करण्यास मदत करतात. यात अँटी-इम्फ्लामेंटरी, अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि ताप कमी करणारे गुणधर्म असतात. काळी मिरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

भारतातील हिंदू धर्मियांच्या घरांमध्ये तुळशीचे रोप असतेच. तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. यात अँटिऑक्सिडंट, अँटी-इम्फ्लामेंटरी आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते आणि शरीराची ऊर्जा वाढते. तुळशीचे पाने तुम्ही चावून खाऊ शकता, चहा किंवा पाण्यात घालून सेवन करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -