सातारा :राजांचे पत्रक ‘वॉर’; प्रभागांचे उघडेना ‘दार’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सातारा नगरपालिकेची आरक्षण सोडत झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या साविआचे नेते दोन्ही राजांच्या मातब्बर सैनिकांच्या दांड्या गुल झाल्याने नवीन प्रभागासाठी त्यांनी ‘हडको’ मोहीम सुरू केली आहे. एकीकडे राजांचे पत्रक ‘वॉर’ आणि दुसरीकडे प्रभागाचे उघडेना ‘दार’ अशी समर्थकांची अवस्था झाली आहे. त्याचवेळी काही इच्छुकांमध्ये अदलाबदलीचे पर्यायही चाचपले जात आहेत.


आरक्षण सोडतीनंतर अनेक विद्यमान नगरसेवकांचे पत्ते कापले गेले. या हद्दवाढ भागातील प्रभाग क्र. 1 मध्ये दोन्ही आघाड्यांकडून नवे चेहरे दिले जाणार आहेत. जनसंपर्क असणाऱ्या जुन्या चेहऱ्यांनाही याठिकाणी संधी दिली जावू शकते.

Join our WhatsApp group