ब्रेकींग: दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा..

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात कोटोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसल्यानंतर आधीच्या सरकारने बंधने कमी केली आणि आता यंदाच्या सरकारने या वर्षी सर्वत्र दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी (Dahihandi Holiday) जाहीर करण्याच्या सुचना महाराष्ट्राचे नवे मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना देण्यात आल्याची माहीती आहे.

“दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर कटा”, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं केली होती. प्रताप सरनाईक हे गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर आमदारांच्या मागणीस जोरदार प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

Join our WhatsApp group